पिंप्राळा-हुडकोत जोरदार धुमक्री शुल्लक कारणावरुन दोन गटात उसळली दंगल: तुफान दगडफेक; दुकाने जाळण्याचा प्रयत्न, खाद्यपदार्थ्यांच्या हातगाड्यांची तोडफोड; सहा जण जखमी; रात्री उशिरापर्यंत
By admin | Published: April 05, 2016 12:14 AM
जळगाव : रिक्षा चालक व प्रवासी महिलेत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पिंप्राळा-हुडको परिसरात सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गटात दंगल उसळली. आक्रमक जमाव तलवारी, रॉड व लाठ्या-काठ्यांसह एकमेकांवर धावून गेला. त्यानंतर तुफान दगडफेक व हाणामारी झाल्याने दोन्ही गटातील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले. काही समाजकंटकांनी परिसरातील खाद्यपदार्थ्यांच्या हातगाड्यांची तोडफोड करत दुकानेही जाळण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत जमाव अनियंत्रित होता.
जळगाव : रिक्षा चालक व प्रवासी महिलेत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पिंप्राळा-हुडको परिसरात सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गटात दंगल उसळली. आक्रमक जमाव तलवारी, रॉड व लाठ्या-काठ्यांसह एकमेकांवर धावून गेला. त्यानंतर तुफान दगडफेक व हाणामारी झाल्याने दोन्ही गटातील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले. काही समाजकंटकांनी परिसरातील खाद्यपदार्थ्यांच्या हातगाड्यांची तोडफोड करत दुकानेही जाळण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत जमाव अनियंत्रित होता.इन्फो-या कारणावरून उसळली दंगलहुडकोत राहणार्या उज्ज्वला सोनवणे शहरातून घरी येण्यासाठी शेख जावेद शेख लुकमान याच्या रिक्षात बसल्या होत्या. हुडकोतील पोलीस चौकीजवळ आल्यानंतर सोनवणे यांनी पुढे नागवंशी चौकात सोडण्याची शेखला विनंती केली. परंतु त्याने नकार दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. तेव्हा सोनवणे यांना पोलीस चौकीजवळच सोडून शेख घरी निघून गेला. याच कारणावरून १५ ते २० मिनिटांनी दोन गट एकमेकांसमोर आल्याने दंगल उसळली.इन्फो-सहा जण जखमीदंगलीत दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका गटातील आकाश मनोहर वाघ (वय १९) व आकाश धिरज सोनवणे (वय २२) दोन्ही रा.पिंप्राळा-हुडको, जळगाव तर दुसर्या गटातील सैय्यद अहमदअली शौकतअली (वय २०), शेख लुकमान चायवाला, सद्दाम शेख रहीम, शेख जावेद शेख लुकमान (चौघे रा.पिंप्राळा-हुडको, जळगाव) यांचा समावेश आहे.दोघा भावांना बेदम मारहाणदंगलीत जखमी झालेले आकाश सोनवणे व आकाश वाघ हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. सोनवणे हा जैन इरिगेशनमध्ये कामाला आहे. तो कामावरून परतल्यानंतर वाघसह दुचाकीचा पंक्चर काढण्यासाठी जात होता. मात्र, त्याच वेळी हुडको पोलीस चौकीजवळ जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. भांडणाशी काहीही संबंध नसताना ते दंगलीत सापडले. आकाश सोनवणे याच्या डोक्यात रॉड टाकल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या नाकासह तोंडालाही मार लागला असून टाके पडले आहेत. वाघ व सोनवणेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.दगड-विटा, काचेच्या बाटल्यांचा खचसंतप्त जमावाने चौकातील १५ ते २० खाद्यपदार्थ्यांच्या हातगाड्या व टपर्यांची तोडफोड करीत दुकाने जाळण्याचा प्रयत्न केला. टेबल व खुर्च्या असे साहित्य जमावाने रस्त्यावर फेकून दिले. दगडफेक झाल्याने रस्त्यावर दगड-विटा, काचेच्या बाटल्यांचा खच पडला होता.