पिंप्राळा हुडको दंगलीतील दुसर्या गटाच्या संशयितांना जामीन ९ जणांचा समावेश : दोन्ही गटातील संशयित जामिनावर बाहेर
By admin | Published: April 19, 2016 12:48 AM
जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरात क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या दंगलीतील दुसर्या गटाच्या ९ संशयित आरोपींना सोमवारी जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या दंगलीतील पहिल्या गटाच्या आरोपींना यापूर्वी जामीन झाला आहे.
जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरात क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या दंगलीतील दुसर्या गटाच्या ९ संशयित आरोपींना सोमवारी जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या दंगलीतील पहिल्या गटाच्या आरोपींना यापूर्वी जामीन झाला आहे.पिंप्राळा हुडको परिसरात ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान क्षुल्लक कारणावरून दोन गटात भीषण दंगल उसळली होती. याप्रकरणी उज्ज्वला रमेश शिरसाळे (३०, रा.पिंप्राळा हुडको, भीमनगर) यांच्या फिर्यादीवरून दुसर्या गटातील संशयित आरोपी शेख जावेद शेख उस्मान, शेख जहीर शेख लुकमान, सैयद अहमद अली सैयद शौकत अली, मुस्लीम शेख समशोद्दीन, नाजीम खान वाजीद खान, शेख आलीम शेख सलीम, जाकीर खान रसूल खान, जावेद खान रसूल खान व अकलाक खान जाकीर खान (सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४९, २९४, ३२३, ५०४, ५०६, ४२७ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३, १, १० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर हे संशयित न्यायालयीन कोठडीत होते. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्यायालयाने सर्व संशयितांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी तर आरोपींतर्फे ॲड.अकिल इस्माइल, ॲड.राशीद पिंजारी यांनी कामकाज पाहिले.