ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. 25- केरळमध्ये डाव्यांच्या डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळालं असून, काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाली आहे. केरळमध्ये एलडीएफनं 91 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर काँग्रेससह मित्र पक्षांचे 47 उमेदवार विजयी झाले आहेत.
डेमोक्रेटिक फ्रंटच्या पिनाराई विजयन यांनी मुख्यमंत्रिपदाची आज शपथ ग्रहण केली आहे. केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांनी पिनाराई विजयन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पिनाराई विजयन यांच्यासह डेमोक्रेटिक फ्रंटच्या 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
ए. पी. जयाराजन, टी. एम. थॉमस इसाक, जी. सुधाकरन, ए. के. बालन, के. के. शैलजा, सी. रविचंद्रनाथ, कदकमपल्ली सुरेंद्रन, टी. पी. रामकृष्णन, जे. मरकुट्टी अम्मा, ए. सी. मोईडीन, के. टी जलील, ए. चंद्रशेखरन, व्ही. एस. सुनील कुमार, पी. थिलोथमन, के. राजू, मॅथ्यू टी. थॉमस, ए. के. ससींद्रन, रामचंद्रन कडनापल्ली आदी आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.