आजची रात्र खगोलप्रेमींसाठीच नाही तर सामान्य लोकांसाठी देखील खास असणार आहे. आज चंद्र गुलाबी होणार आहे. हा नजारा पाहण्यासाठी तुम्हाला मात्र ती खास वेळ पहावी लागणार आहे.
लोक गुलाबी चंद्र पाहण्यासाठी उत्सुक असतात. याला फुल मूनही म्हटले जाते. गुलाबी चंद्र म्हटले म्हणजे तो काही पूर्णपणे गुलाबी दिसत नाही. वसंत ऋतूतील पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्राला गुलाबी चंद्र म्हणतात. सामान्य दिवसांपेक्षा आजचा चंद्र थोडा जास्त गुलाबी छटेचा दिसतो. चंदेरी आणि सोनेरी छटा एकत्र झाल्याने हा रंग बदल होतो. उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या जंगली फुलावरून हे नाव देण्यात आले आहे.
उत्तर अमेरिकेत बदलत्या ऋतूचे हे संकेत असतात. फ्लॉक्स असे या फुलाचे नाव आहे. अमेरिकेतील वेळेनुसार आज रात्री ठीक रात्री ८.२२ वाजता हा चंद्र गुलाबी छटेमध्ये दिसणार आहे. तर भारतातील लोकही आजच परंतू रात्री बारानंतर १३ एप्रिल रोजी पहाटे ३.२१ ते ५.५१ या वेळेत हा चंद्र पाहू शकणार आहेत.
तुमच्या घरातून, बाल्कनीतून किंवा छतावरून दुर्बिणीशिवाय हा गुलाबी चंद्र तुम्ही पाहू शकणार आहात. सूर्यास्तानंतर लगेचच पूर्वेला चंद्र उगवतो आणि मोठा आणि अधिक रंगीबेरंगी दिसतो, असे नासाने म्हटले आहे. ओल्ड फार्मर्स पंचांगानुसार, एप्रिलमधील गुलाबी चंद्र हिवाळ्याच्या सुस्तीनंतर सामान्य जीवनाचे पुनरागमन आणि निसर्गाचे पुनरुज्जीवन दर्शवितो. या गुलाबी चंद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या नंतर येणारा पहिला रविवार हे ईस्टर संडे असतो. जो यावर्षी २० एप्रिलला येत आहे. काही ठिकाणी हा चंद्र काहीसा केशरी देखील दिसू शकतो.