ऑनलाइन
सुरत, दि. 11 - नोटांबदी निर्णयानंतर नवीन नोटांसंबंधी एकापेक्षा एक अनोख्या गोष्टी समोर येत आहेत. काही ठिकाणी नोटाबंदीच्या समर्थनार्थ फॅशन शो आयोजित करण्यात आला तर काही कॅशलेश गावांच्या बातम्या समोर येऊ लागल्या. यावेळी नोटाबंदीसंदर्भात अनोखी बातमी गुजरातमधील सुरत येथून समोर आली आहे. केंद्र सरकारने 2 हजार रुपयांची गुलाबी रंगाची नवीन नोटा चलनात आणल्यानंतर सुरतमधील शिव सैनी या व्यापा-याने 2000 रुपयांच्या नोटेचं डिझाईन असलेली साडी बाजारात आणली आहे.
(यूपीमध्ये लवकरच राहुल-अखिलेशच्या प्रचाराची दंगल?)
6 मीटर लांब असलेल्या या साडीवर 2 हजार रुपयांच्या 504 नोटांची प्रिटेंड डिझाईन आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साडीची किंमती अगदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. या साडीची किंमती केवळ 160 रुपये एवढीच आहे.
शिव यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा असलेली साडीही बाजारात आली होती. यानंतरच 2 हजार रुपयांच्या नोटेचं डिझाइन असलेली साडीची कल्पना समोर आली.
ज्या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत, तिथे 2000 रुपयांच्या नवीन नोटेचे डिझाईन असलेल्या या साडीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची सैनी यांनी सांगितले. उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये या साडीला प्रचंड मागणी आहे.
नोटाबंदी निर्णय लोकांनी स्वीकारला असो किंवा नसो, मात्र व्यवसायात नफा व्हावा, यासाठी व्यापारी नवीन नोटांच्या डिझाईनचा चांगला वापर करत असल्याचे या नवीन आणि अनोखी डिझाईन असलेल्या साडीच्या उदाहरणातून दिसत आहे. शिवाय महिला वर्गानेही अनोख्या डिझाईनच्या साडीची खरेदी करण्यासाठी सैनी यांच्या दुकानात गर्दी केली आहे.
Gujarat: Saree with print of the newly introduced pink-coloured Rs. 2000 note hit Surat markets #demonetisationpic.twitter.com/4tO2Rl41m0— ANI (@ANI_news) 11 January 2017