शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

पिटबुलचा 10 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला; संपूर्ण चेहरा फाडला, डॉक्टरांनी लावले 150 टाके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 7:47 PM

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पिटबुलच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडत आहेत.

गाझियाबाद: देशभरात पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. विशेषत: दिल्ली एनसीआरमध्ये अशाप्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. आता ताजी घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका 10 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला केला, यात जखमी झालेल्या मुलाच्या चेहऱ्यावर 150 टाके लावावे लागले.

काही दिवसांपूर्वीच गाझियाबादच्या एका सोसायटीत लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर नोएडाचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये कुत्र्याने लिफ्टमधील एका व्यक्तीवर मालकासमोर हल्ला केला. आता पुन्हा एकदा गाझियाबादमधून कुत्र्याच्या हल्ल्याची बातमी समोर आली आहे. उद्यानात खेळणाऱ्या एका 10 वर्षीय मुलावर पिटबुलने हल्ला चढवला. ही घटना चार दिवसांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

तोंडावर 150 टाके उद्यानात खेळणाऱ्या मुलावर पिटबुलने अचानक हल्ला केला, कुत्र्याने मुलाचे तोंड आपल्या जबड्यात पकडले. यावेळी कुत्र्याने त्या निष्पापाचे गाल फाडले. कसेबसे कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर 150 टाके टाकले आहेत.

पोलिसांत तक्रार दाखलगाझियाबादच्या बापुधाम भागातील संजय नगरमध्ये ही घटना घडली असून मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत तक्रारही दाखल केली आहे. या कुत्र्याच्या मालकाचे नाव ललित त्यागी असून तो संजय नगर परिसरात राहतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका पिटबुलने आपल्या वृद्ध मालकिनीवर हल्ला करुन जीव घेतला होता. हल्ल्यानंतर प्रशासनाने कुत्र्याला आपल्या ताब्यात घेतले. त्या घटनेची देशभर चर्चा झाली होती.

टॅग्स :dogकुत्राUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस