नवी दिल्ली- नव्या रेल्वेमार्गांबरोबररेल्वेच्या आधुनिकीकरणावर आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. येत्या काही वर्षांमध्ये रेल्वेमध्ये पूर्ण बदल व्हावा यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काही विशेष मुद्द्यांवर भर देण्याचे निश्चित केले आहे.
1) वेळापत्रकानुसार रेल्वे धावणे याला प्राधान्य असेल असे पीयूष गोयल यांनी सांगितले. नियोजित वेळेवर रेल्वेने प्रवास करावा यासाठी नियोजन केल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या येण्याजाण्याच्या दैनंदिन वेळेची नोंद स्टेशनमास्तरच्या ऐवजी आता डेटा लॉगर्सकडून होत आहे. त्यामुळे वेळेवर रेल्वे धावण्याच्या प्रमाणात 1 एप्रिल 2018 पासून 73 ते 74 टक्के सुधारणा झाली आहे.2) प्रत्येक रेल्वेमध्ये जीपीस बसवण्याचा विचारही रेल्वेने केला आहे. त्यामुळे प्रत्येक रेल्वे सध्या नक्की कोठे आहे हे मोबाइलवरही तपासणे शक्य होणार आहे. त्यामुळे ट्रेनचा रिअलटाइम डेटा उपलब्ध होईल.3) रेल्वेचे पूर्ण विद्युतीकरण केल्यास 2 अब्ज डॉलरची बचत होईल असे भारतीय रेल्वे खात्याचे मत आहे. गोयल यांच्या मते, एका डिझेल इंजिनचे ओवरहॉलिंग करण्याचा खर्च आणि त्याचे इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर करण्याचा खर्च समानच आहे. त्यामुऴे कोणताही वेगळा निधी न वापरता सर्व इंजिन्सचे इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे यामुळे प्रदुषणात लक्षणीय घट होईल असाही विश्वास त्यांना वाटतो.4) रेल्वेचे वेळापत्रक सुधारावे यासाठी स्मार्ट टाइमटेबल तयार करण्याचा विचार करण्यात आलेला आहे.
7) पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये भारतामध्ये 6 हजार रेल्वे स्थानकांवर वायफाय सेव देण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम प्रदेशातील स्थानकांना त्याचा जास्त लाभ होईल.