शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पियूष गोयल, स्मृती इराणींना दे धक्का; आणखी एक महत्त्वाचं खातं गुजराती व्यक्तीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 11:32 PM

मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; गोयल, इराणी यांच्याकडून महत्त्वाची खाती काढली

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अनेक महत्त्वाची खाती असलेल्या मंत्र्यांना आज नारळ देण्यात आल्यानं खातेवाटपाकडे लक्ष लागलं होतं. मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मोठे बदल! रेल्वेमंत्रिपदावरून गोयल यांना डच्चू; अमित शहांवर मोठी जबाबदारी

पियूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. रेल्वेची जबाबादारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गोयल यांच्याकडे वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी असेल. अरुण जेटली यांच्या निधनानंतर अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या गोयल यांच्याकडे रेल्वेसारखं महत्त्वाचं खातं देण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना डच्चू मिळाला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का देण्याची तयारी?; मोदींनी शहांवर सोपवली नवी जबाबदारी

स्मृती इराणी यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. आता त्यांच्याकडे केवळ महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचा कारभार ठेवण्यात आला आहे. स्मृती यांनी याआधी शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यावेळी त्यांची डिग्री वादात सापडली होती. काही काळासाठी त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभारदेखील होता. २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं. मात्र आता या महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे.

गुजराती व्यक्तीकडे आणखी एक महत्त्वाचं खातंपंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूळचे गुजरातचे आहेत. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रीपद अमित शहांकडे आहे. यानंतर आता आरोग्य मंत्रिपददेखील गुजराती व्यक्तीकडे सोपवण्यात आलं आहे. मनसुख मांडविया यांच्याकडे आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. मांडविया मोदींचे विश्वासू मानले जातात. शहांकडे गृह मंत्रालयासोबतच सहकार मंत्रालयाची जबाबदारीदेखील दिली गेली आहे. या मंत्रालयाची निर्मिती कालच करण्यात आली आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाSmriti Iraniस्मृती इराणीpiyush goyalपीयुष गोयल