नवी दिल्ली: दिल्लीत २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता दीप सिद्धू याने पोलीस चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. पोलिसांनी मंगळवारी दीप सिद्धूची कसून चौकशी केली. यावेळी कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी आपला संबंध नाही. मात्र, तोडफोड करण्याचे समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असे सांगत फक्त भावनेच्या भरात शेतकरी आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा दीप सिद्धूने केला आहे. (Initial details from Deep Sidhu’s questioning in R-Day violence case emerge)
याचबरोबर, "सरकारशी चर्चा करताना आणि ट्रॅक्टर रॅलीवेळी शेतकरी नेते नरमाईची भूमिका घेत होते, असा माझा संशय होता. लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हते. त्याचवेळी ऑगस्टपासून पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन सुरू झाले आणि मी त्याकडे आकर्षित झालो" असे दीप सिद्धू म्हणाला.
स्वयंसेवकांचे जॅकेट चोरण्यास सांगितलेशेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गेल्यावर त्याठिकाणी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. यामुळे 28 नोव्हेंबर रोजी तो दिल्लीत दाखल झाला. प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी निर्धारित मार्गावरून न जाण्याचा त्याने निर्णय आपल्या समर्थकांसोबत घेतला. त्यामुळे त्याने आपल्या समर्थकांना आंदोलनातील स्वयंसेवकांचे जॅकेट चोरण्यासही सांगितले, असे दीप सिद्धू याने म्हटले आहे. तसेच, दीप सिद्धूने आधीच लाल किल्ल्यावर आणि शक्य झाल्यास इंडिया गेटवरही जाण्याचा प्लान केला होता. पोलीस चौकशीत हे समोर आले आहे की, फरार आरोपी जुगराज सिंगला लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवण्यासाठी खास बोलावण्यात आले होते.
याआधी सुखविंदर सिंगला अटकयाप्रकरणी सुखविंदर सिंग याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. हा आधीपासून आंदोलनात सहभागी होता. तो लाल किल्ल्याच्या लाहौरी गेटवर दिसला होता. 2 फेब्रुवारी रोजी गाझीपूर बॉर्डरवर त्याने राकेश टिकैत यांची भेटही घेतली होती. तसेच, 6 फेब्रुवारी रोजी चक्का जाम आंदोलनातही सहभागी झाला होता. त्याला चंदीगड येथून अटक करण्यात आली आहे.
लक्खा सिधाना शोध सुरुया प्रकरणातील दुसरा आरोपी लक्खा सिधाना याचाही पोलीस शोध घेत आहे. लक्खा सिधाना सातत्याने लोकेशन बदलत आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्या जुगराजची लोकेशन कुंडली येथे दाखवली जात आहे. तो पाच दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये लपला असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र आता त्याचे शेवटचे लोकेशन सिंघु बॉर्डर दाखवले जात आहे. लक्खा याला पकडण्यासाठी स्पेशल सेल आणि क्राइम ब्रांचच्या अनेक टीम टेक्निकल सर्व्हिलॉन्सची मदत घेत आहेत.