भुवनेश्वर : भारतीय उपमहाखंडातील अलकायदा (एक्युआयएस) या संघटनेचा दहशतवादी मोहम्मद अब्दुल रहमान याने १९९९ चे कंधहार विमान अपहरण आणि २००२ साली कोलकात्यात अमेरिकन सेंटरवर झालेल्या स्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांसोबत संबंधांची कबुली दिली आहे.ओडिशा पोलीस गुन्हे शाखेच्या विशेष कार्यदलातील (एसटीएफ) एका अधिकाऱ्याने गुरुवारी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, रहमानने कटकमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याला आश्रय दिला होता. हरकत-उल-मुजाहिदिन गटाच्या या दहशतवाद्याने काठमांडूतून दिल्लीत येणाऱ्या एअर इंडियाच्या आयसी-१८६ या विमानाचे अपहरण करून ते कंधहारला नेले होते. अपहरणकर्त्यांनी विमान प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात भारतातील कारागृहात बंदिस्त मसुद अजहरच्या मुक्ततेची मागणी केली होती. (वृत्तसंस्था)
विमान अपहरणात होता माझाही सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2016 12:10 AM