नवी दिल्ली - या आठवड्यामध्ये ब्रह्मांडामध्ये एक दुर्मीय योगायोग दिसणार आहे. विश्वाचा हा अद्भूत नजारा अगदी साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे सूर्यमालेतील ग्रह एका रेषेमध्ये दिसणार आहेत. यापूर्वी असे दृश्य इसवी सन ९४७ मध्ये दिसले होते. सूर्योदयापूर्वी एक तास आधी आकाशात या दुर्मीळ योगायोगाचे साक्षीदार होता येणार आहे.
पठाणी सामंत तारामंडळ ग्रह परेडचे उपसंचालक डॉ. एस. पटनायक यांनी सांगितले की, या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू एका रेषेमध्ये राहतील. यापूर्वी असा योग इस ९४७ मध्ये आला होता. हे दृश्य साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. हा नजारा सूर्योदयापूर्वी एक तास आधी आकाशामध्ये दिसेल.
उत्तर गोलार्धातील म्हणजे इक्वोटर लाइनच्या वरील भागातील देशातून हा नयनरम्य देखावा पाहता येणार आहे. भारतातूनही हे चित्र अगदी सहजपणे दिसणार आहे. जर त्यावेळी आकाश स्वच्छ असेल तर हा नजार पाहता येणार आहे. जर तुम्हालाही हे दुर्मीळ दृष्य पाहायचे असेल तर सूर्योदयापूर्वी आकाशात पाहावे लागेल.
जेट प्रोपल्शन लेबॉरेटरीने सांगितले की, ग्रह अशा प्रकारे एका ओळीत आले याचा अर्थ सर्व ग्रह एकमेकांच्या जवळ आले असा होत नाही. हे ग्रह अंतराळात एकमेकांपासून अद्यापही अब्जावधी किमी दूर आहेत. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. आपली पृथ्वीही सूर्याभोवती फिरत आहे.