विविध शाळा-संस्थांचे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2016 12:45 AM
भाऊसाहेब राऊत विद्यालय
भाऊसाहेब राऊत विद्यालयअखिल कोळी समाज परिषद संचलित भाऊसाहेब राऊत विद्यालयातर्फे वनमहोत्सव अंतर्गत विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष ॲड.जे.टी.पाटील, उपाध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे, सचिव रवींद्र रेवदंडकर, संचालक रामदास लोखंडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.आर.कोळी यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. कडूलिंब, करंज, रेनट्री, अशोक या प्रजातीचे रोपे लावण्यात आली पर्यवेक्षक एल.एस.तायडे, ए.एस.बाविस्कर, हरित सेना प्रमुख राजेश जाधव, उपप्रमुख एस.डी.राजपूत व हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.मातोश्री प्राथमिक विद्यालय प्रबोधन संस्था संचलित मातोश्री प्राथमिक विद्यालयात संस्थापक व माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले. व्यासपीठावर केंद्रीय विद्यालयाचे माजी प्राचार्या राजकुमारी गौतम, उमवि येथील प्राध्यापक दिनेश गौतम व मुख्याध्यापक समाधान इंगळे व शिक्षकवृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली श्रीधर पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक समाधान इंगळे,शारदा मोहीते, मिलिंद नाईक, प्रमोद झलवार, सुनीता पवार, सविता बाविस्कर, माधुरी बागले, सुरेखा पाटील, सरला पाटील आदींनी परिश्रम घेतले.मानवसेवा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयमानवसेवा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.एस.डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर, शिशू विकास केंद्राच्या मुख्याध्यापिका मुक्ता पाटील व सुनील दाभाडे यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले.कै.गि.न.चांदसरकर शाळाकै.गि.न.चांदसरकर बालमोहन मराठी शाळा व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यानी वृक्षदिंडी काढली. अध्यक्षस्थानी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका वनमाला जैन होते. प्रमुख पाहुणे आबा कापसे, नगरसेविका प्रतिभा कापसे, शोभा बारी, चंद्रकांत वाणी तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिक सुरेखा चौधरी उपस्थित होते. यावेळी ३० वृक्षांची लागवड करण्यात आली. सूत्रसंचालन संदीप बागुल यांनी केले तर आभार प्रभाकर खराटे यांनी मानले. शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अभिनव विद्यालयमाहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय (माध्यमिक) येथे शालेय परिसरात जि.प.च्या माध्य. अधीक्षक प्रतिभा सुर्वे, गट शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. प्रतिभा फाऊंडेशनतर्फे २० रोपे व ट्रिगार्ड देण्यात आले. मुख्यापिका सरोज तिवारी यांनीही वृक्षारोपण केले. विद्यालयातील अश्वीनी साळुंखे, ज्योती शिंदे, नीता पाटील, संतोष सपकाळे, गुरु बारेला, अनिल जोशी, कुणाल बडगुजर उपस्थित होते. श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती विद्यालयमहाबळ कॉलनीतील श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती विद्यालयातर्फे महाबळ परिसर व नागेश्वर कॉलनीत राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, नगरसेविका सविता शिरसाठ, संजय नेमाडे, प्रभाग अधिकारी आर.टी.पाटील, बांधकाम अभियंता एस.एम. भांडारकर,पाणीपुरवठा अधिकारी, नागरिक पंकज जैैन, किरण सोनवणे, चेतन चव्हाण, विजय अहिरराव, दीपक तांबोळी आदींनी वृक्षारोपण केले. मुख्याध्यापक एन.एच.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक एन.एम.चौधरी, एस.पी.चौधरी, पी.आर,जाधव, डी.जी.पाटील, के.एच.पाटील, टी.एस.माळी,