शिवाजी विद्यालयाचे खेळाडू विभागीय स्तरावर
By admin | Published: September 13, 2014 10:59 PM
आकोट : क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेमध्ये स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली.
५ सप्टेंबरपासून अंमलबजावणीनाशिक : शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) काढण्यासाठी अर्ज करणार्या अर्जदारांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्यापूर्वी ऑनलाइन अपॉईंटमेंट (वेळ निश्चित करून) घ्यावी लागणार आहे़ अन्यथा त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे़या प्रसिद्धिपत्रकानुसार ७ ऑगस्टपासून ऑनलाइन अपॉइंटमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ तसेच या ऑनलाइन अर्ज प्रणालीमुळे शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी (लर्निंग लायसन्स) अर्ज करणार्यांना विशेष लाभ होत आहे़ त्यामध्ये सोईनुसार वेळ घेता येते, वेळेची बचत होते, अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्मतारीख याची अचूक माहिती नोंदविली जाते़ तसेच या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास लगेच शिकाऊ लायसन्स दिले जाते़ऑनलाइन अपॉइंटमेंटची योजना यशस्वीरीत्या चालू झाल्याने व अर्जदारांच्या वेळेत बचत होत असल्याने ५ सप्टेंबरपासून शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्यासाठी अर्ज करणार्या अर्जदारांना ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊनच निश्चित केलेल्या वेळेमध्ये कार्यालयात हजर राहणे आवश्यक असणार आहे़ जे ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणार नाहीत त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचेही प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे़(प्रतिनिधी)