गुरूला वरचा दर्जा देण्यात आला आहे. योग्य आणि अयोग्य यातील फरक आपल्याला समजावून सांगणारा गुरुच असतो, म्हणूनच शिक्षक हे खरे मार्गदर्शक असल्याचं म्हटलं जातं. अशा परिस्थितीत मुझफ्फरपूरमध्ये एक अनोखं चित्र समोर आलं आहे, जिथे एका शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी ढसाढसा रडू लागले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका शिक्षकाच्या निरोप समारंभाला सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. मुलं ढसाढसा रडू लागली. निरोप घेताना शिक्षकांनी सर्वप्रथम सर्व शिक्षकांना मिठी मारली आणि निरोप घेतला. यानंतर शाळकरी मुलांनीही त्याच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थी त्यांना हार घालतात आणि शालही भेट देतात.
मुलांची ही आपुलकी पाहून शिक्षकाच्याही डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर "प्लीज सर, जाऊ नका..." असं म्हणत मुलंही रडू लागली. एका मुलाने शिक्षकाला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. मुलांचे आपल्या शिक्षकावरचे प्रेम पाहून सगळेच भावूक झाले. हे संपूर्ण प्रकरण मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा ब्लॉक अंतर्गत श्रेणीसुधारित माध्यमिक शाळा धनौर दिहशी संबंधित आहे.
अनिल कुमार सिंह यांनी 13 वर्षे शिक्षक म्हणून काम केलं. शाळेतील मुलांना ते खूप आवडायचे. अनिल कुमार सिंह हे त्यांच्या कार्यकाळात अत्यंत वक्तशीर होते. लोकांकडून कधीच तक्रार आली नाही. 13 वर्षात ते सर्वांशीच जोडले गेले होते. सध्या व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत.