नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवा (मंगळवारी) आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. उद्योग जगतातल्या अनेकांनी या पॅकेजचं स्वागत केलं आहे. यानंतर आता कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यानंदेखील सरकारचं अभिनंदन केलं आहे. सरकारनं माझ्यासारख्या उद्योगपतीकडे दुर्लक्ष का करतंय, असा प्रश्न विजय मल्ल्यानं उपस्थित केला आहे. 'कोविड-१९ चा सामना करण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल सरकारचं अभिनंदन. सरकार कितीही नोटा छापू शकतं. पण सरकारी बँकांकडून घेतलेलं १०० टक्के कर्ज परत करण्याची तयारी दर्शवणाऱ्या व्यक्तीकडे सरकार दुर्लक्ष का करतंय? कृपया मी देत असलेला पैसा विनाअट घ्या आणि हे सगळं संपवा,' असं मल्ल्यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
CoronaVirus: मला बी योगदान देऊ द्या की; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:39 PM