नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी अधिकाराचा गैरवापर करून बॉलिवूडचे अभिनेते व काहींना ब्लॅकमेल करीत असून, यातून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला. लोकसभेत सोमवारी नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (अमेंडमेंड) विधेयक २०२१ चर्चेसाठी मांडले आहे. या विधेयकावरील चर्चेत भाग घेताना खासदार सुळे यांनी मुंबईत एनसीबीने केलेल्या कारवाईचा संदर्भ घेऊन नार्कोटिक्स विभागाच्या एकूण कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले. केवळ सनसनाटीयासाठी मीडिया ट्रायल चालविली जाते. व्हीलनच्या रूपात त्यांना समाजासमोर उभे केले जाते. अखेर या गुन्ह्यांचे काय होते, हे समजत नाही. व्यसनाच्या विरोधात सर्वच आहेत. महाराष्ट्रात तर तंबाखूवर सुद्धा निर्बंध लादले आहेत. सनसनाटी निर्माण करून आपला पब्लिसिटी साधण्याचा हा प्रकार बंद झाला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
...हा तर बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव -सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 9:59 AM