मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे कायमच चर्चेचा विषय असतो. मोदी कायम परदेश दौऱ्यावर असतात, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त असतात, अशा शब्दांमध्ये त्यांची खिल्लीदेखील उडवली जाते. त्यामुळे मोदींनी देशातील कोणत्या राज्यांना कितीवेळा भेट दिली, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मोदींनी उत्तर प्रदेशचे सर्वाधिक दौरे केले. यानंतर मोदींचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातचा क्रमांक लागतो. तर मोदींनी सिक्कीमला सर्वात कमी वेळा भेट दिलीय. 2014 ते 2018 या कालावधीत मोदींनी उत्तर प्रदेशचे सर्वाधिक दौरे केले. मोदींनी या ठिकाणी केलेल्या औपचारिक आणि अनौपचारिक दौऱ्यांची संख्यादेखील जास्त आहे. उत्तर प्रदेशात मोदींनी 25 औपचारिक आणि 24 अनौपचारिक केले. गेल्या चार वर्षांमध्ये मोदींनी गुजरातला 23 वेळा औपचारिक भेटी दिल्या, तर 10 वेळा अनौपचारिक भेटी दिल्या. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ही आकडेवारी उपलब्ध आहे. पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश आणि गुजरातला सर्वाधिक भेटी दिल्या. याउलट त्यांनी सिक्कीम, मिझोरम आणि पुद्दुचेरीला केवळ एकदा भेट दिलीय. तर त्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये अरुणाचल प्रदेश आणि नागालँडला प्रत्येकी दोनदा भेट दिली.
मोदींनी कोणत्या राज्याला किती वेळा भेट दिली, माहितीय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 2:46 PM