नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी अचानक लडाख सीमेला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रÑपती भावनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. चीनच्या कुरापतींनी सीमेवरील तणाव कमी होण्याची चिन्हे नसताना होत असलेली ही भेट लक्षणीय मानली जात आहे.यात मोदींनी ‘महत्वाच्या अशाराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाबींवर राष्ट्रपतींना माहिती दिली’, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले असले तरी या भेटीचा मुख्य संदर्भ सीमेवरील घडामोडींशी असल्याचे माहितगारांकडून कळते. लेह येथे जाऊन गलवान संघर्षात जखमी झालेल्या जवानांची विचारपूस, सीमेवर तैनात असलेल्या जवानांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याखेरीज मोदींनी लष्कराच्या वरिष्ठ कमांडरांशी व्यक्तिगत चर्चा करून सीमेवरील नेमकी परिस्थिती व त्यादृष्टीने केलेल्या लष्करी सज्जतेची सविस्तर माहिती करून घेतली होती. सैन्यदलांचे सरसेनापती या नात्याने पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना भेटणे ही औपचारिकता असली तरी मोदींनी कोविंद यांना स्वत: प्रत्यक्ष घेतलेला आढावा व त्याविषयी आपले अभिप्राय राष्ट्रपतींना कळविले, असे समजते.
लष्करी सज्जतेची राष्ट्रपतींना दिली माहिती, सीमेवरील तणावाच्या स्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 6:39 AM