नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पीएम कॅअर्स फंडची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यानुसार, या फंडची स्थापना झाल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत त्यात 3,076 कोटी रुपये जमा झाले आहेत.
पीएम केअर्स फंडद्वारे देयक आणि जमा केलेल्या 2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ऑडिट अहवालातून ही माहिती प्राप्त झाली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पीएम केअर्स फंडची स्थापना 27 मार्चला करण्यात आली होती. या फंडची सुरुवात 2.25 लाख रुपयांनी झाली होती.
या अहवालानुसार, पीएम केअर्स फंडमध्ये देशातील लोकांनी स्वेच्छेने 31 मार्च 2020 पर्यंत पहिल्या पाच दिवसांत 3,075.8 कोटी रुपयांची देणगी दिली दिले. हा अहवाल 27 मार्च ते 31 मार्च या पाच दिवसांचा आहे. यानंतरचा अहवाल या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर म्हणजे एप्रिल 2021 मध्ये किंवा त्यानंतर येण्याची शक्यता आहे. परंतु, ही रक्कम कोणत्या व्यक्तीने दिली आहे, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
विदेशातून आली इतकी देणगी अहवालानुसार, पीएम केअर्स फंडमध्ये 31 मार्चपर्यंत 39.6 लाख रुपयांची विदेशी देणगी प्राप्त झाली आहे. इतकेच नाही तर पहिल्या पाच दिवसांत देशांतर्गत 35.3 लाख रुपयांची देणगी आणि विदेशी देणग्यांमधून 575 रुपये व्याज मिळाले होते. अशा प्रकारे विदेशी देणग्यांवरील सेवा कर कपात केल्यानंतर पीएम केअर्स फंडमध्ये एकूण 3,076.6 कोटी रुपये जमा झाले आहेत.
या फर्मकडून ऑडिटिंग...पीएम केअर्स फंडचे ऑडिटिंग एसएआरसी अँड असोसिएट चार्टर्ड अकाउंटंटद्वारे करण्यात आले आहे. यावर पीएमओच्या चार अधिकाऱ्यांनी सही केली आहे. सही करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सचिव श्रीकर के परदेश, उपसचिव हार्दिक शाह, अवर सचिव प्रदीपकुमार श्रीवास्तव, विभाग अधिकारी प्रवेश कुमार यांचा समावेश आहे.
पीएम केअर्स फंडकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर 27 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'प्राईम मिनिस्टर्स सिटिझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड'ची सुरुवात केली. 'PM केअर्स फंड' या सुटसुटीत नावाने हा फंड ओळखला जातो.
नरेंद्र मोदींचे आवाहन"सर्व भारतीयांना मी विनंती आहे की, PM केअर फंडमध्ये देणगी द्या," असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटही केले होते. तसेच, या फंडमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईसह अशाच तणावाच्या स्थितींशी लढण्यासाठी बळ मिळेल आणि निरोगी भारत बनविण्यासाठी हे सर्व महत्त्वाचे असेल, असेही मोदी म्हणाले होते. मोदींच्या आवाहनानंतर उद्योजक, सेलिब्रेटी, कंपन्या आणि सर्वसामान्य लोकांकडून शक्य तितकी भरघोस मदत देण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्ष पीएम केअर्स फंडच्या पारदर्शकतेवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. पंतप्रधान सहाय्यता निधी असताना नवीन फंडची स्थापना करण्याची काय आवश्यकता होती, असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे.
आणखी बातम्या...
- कौतुकास्पद! सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी स्वीकारली
- तरुणांना भाषण नको, नोकऱ्या पाहिजेत; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम
- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती
- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम
- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा