ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा वापर स्वत:च्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी करु नका असा सल्ला नोकरशहांना दिला होता. त्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टि्वटरवरुन टोला लगावला.
पंतप्रधानांनी स्वत: आदर्श घालून दिला पाहिजे. पण पंतप्रधान स्वत:चे उदहारण देऊन नेतृत्व करत नाहीत अशी उपरोधिक टीका राहुल यांनी केली. त्यावर लगेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी टि्वटकरुन राहुल गांधींवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोकरशहांना स्वत:च्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करु नका असा सल्ला दिला असला तरी, मोदी स्वत: सोशल मीडियावर सक्रीय आहेत. टि्वटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
Leading by example is clearly overrated https://t.co/EZa4cjp04n— Office of RG (@OfficeOfRG) April 22, 2017
काय म्हटल होत मोदींनी
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना अधिका-यांना सल्ला देत जर तुम्ही तुमच्या कामाची पद्दत बदललीत तर काही आव्हानांचं रुपांतर संधीत होऊ शकतं. काही गोष्टींमध्ये बदल घडवण्यासाठी आजच्या वेळेत अधिकारी महत्वाची भूमिका बजावतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांना सोशल मीडियाचा वापर करण्याचाही सल्ला दिला. स्वत:चा प्रचार करण्यापेक्षा जास्त आपल्या कामाची पद्दत बदलण्यावर भर दिला पाहिजे असं मोदींनी सांगितलं.
तप्रधान नरेंद्र मोदींनी अधिका-यांना पुर्ण मेहनतीने काम करण्याचा सल्ला देताना सांगितलं की, सरकार बदलत राहिल पण सिस्टम नेहमीच लागू असले. "आज परिस्थिती बदलण्याची संधी मिळाली आहे. निष्ठेने काम केलं पाहिजे, आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तो दिवस आठवा जेव्हा तुम्ही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला होतात. तेव्हा तुम्ही काय स्वप्न पाहिली होती, त्यामध्ये काही बदल झाला आहे का ?" असा विचार करायला मोदींनी सांगितलं. उदाहरण देताना मोदी बोलले की, "फक्त खड्डा खोदणं आणि भरणं याच्याने काही होणार नाही. रोपटंही लावलं पाहिजे. आपण जे काही करु त्याचा निकाल दिसला पाहिजे".
Look who is talking about being over rated :-) https://t.co/5bOpFHTMj0— Smriti Z Irani (@smritiirani) April 22, 2017