पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. आतापर्यंत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण १३ हप्ते जमा करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी या योजनेच्या १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
केंद्र सरकारकडून सध्यातरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील १४ वा हप्ता २६ मे ते ३१ मे या दरम्यान, जमा करू शकते. आता या योजनेत पती आणि पत्नी या दोघांनाही लाभ मिळणार का? याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकरी कुटुंबासाठी चालवली जाते. त्यामुळे जर पती आणि पत्नी दोघेही शेतकरी असतील तरीही योजनेचा लाभ केवळ कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळेल. ही बाब किसान पोर्टलवर सरकारने स्वत: स्पष्ट केली आहे. या योजनेमध्ये एका पेक्षा अधिक शेतकरी नोंद करत असतील तर ती रद्द केली जाते. तसेच जर दोघांना या योजनेचा लाभ मिळत असेल तर सरकार तो कधीही वसूल करू शकते.
अशी तपासा लाभार्थ्यांची यादी१३व्या हप्त्यानंतर नोंदणी करणाऱ्या आणि आधीपासून या योजनेशी जोडले गेलेले शेतकरी त्यांना पुढील हप्ता मिळणार की नाही हे सहजपणे शोधून काढू शकतात. पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लाभार्थ्यांची यादी पाहून तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार की नाही, हे तुम्ही सहजपणे तपासू शकता.