शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 10:39 IST

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार आज शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने दोन हजार रुपये पाठवणार आहे. 

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज म्हणजेच १८ जून रोजी पहिल्यांदाच वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी ते देशभरातील जवळपास १० कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीच्या पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी करतील. पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार आज शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने दोन हजार रुपये पाठवणार आहे. 

खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर आज पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. वाराणसीत शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी ही भेट देणार आहेत. याशिवाय, स्वयं-सहायता गटांच्या (SHGs) ३०,००० हून अधिक सदस्यांना प्रमाणपत्रे देखील नरेंद्र मोदी प्रदान करतील. त्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे, जेणेकरून ते पॅरा-विस्तार कामगार म्हणून काम करू शकतील आणि शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करू शकतील. 

दरम्यान, पीएम किसान योजनेसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (DBT) उपक्रम आहे, जो २०१९ मध्ये सुरू झाला होता. या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेंतर्गत आतापर्यंत केंद्र सरकारने ३.०४ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम १६ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वितरित केली आहे. तसेच, या योजनेचा देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकरी लाभ घेत आहेत.

योजनेचे तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतातपीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तीन हप्त्यांमध्ये हे पैसे मिळतात. दरवर्षी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान हस्तांतरित केला जातो. मात्र, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. काही वेळा लाभार्थ्यांचे पैसेही अडकतात. अशा परिस्थितीत, पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तसेच, काही हेल्पलाइन क्रमांक देखील आहेत (हेल्पलाइन क्रमांक- १५५२६१ किंवा १८००११५५२६) ज्यावर शेतकरी त्यांच्या समस्या सोडवू शकतात.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश