शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

PM KISAN Yojana: शेतकऱ्यांनो बँक खाते चेक करा; मोदींकडून पीएम किसानचा 8 वा हप्ता जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 12:45 PM

PM Narendra Modi releases 8th installment of PM Kissan: डिसेंबर 2018 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेनुसार छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ केवळ 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लोकांनाच होत आहे. 

PM KISAN Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 8 वा हप्ता जारी केला आहे. यानुसार 9.5 कोटी लाभार्थ्यांना 19000 कोटी रुपये वळते करण्यात आले आहेत. थोड्याच दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आठव्या हप्त्याचे 2000 रुपये पोहोचणार आहेत. (PM released 8th installment worth over Rs 20,000 cr to 9.5 cr farmers under PM-KISAN)

डिसेंबर 2018 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेनुसार छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ केवळ 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लोकांनाच होणार आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

पैसे आले का? असे चेक करा...पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.वेबसाईटच्या उजव्य़ा बाजुला Farmers Corner वर क्लिक करा. Farmers Corner च्या खाली Beneficiary Status चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. यानंतर नवीन पेज ओपन होईल, त्यावर तुमचा आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा मोबाईल नंबर चा पर्याय निवडा. यानंतर जो पर्याय येईल त्यावर तुमही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका. यानंतर  'Get Data' वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सर्व हप्त्यांची माहिती मिळेल. 

 

PM Kisan वर Loanपीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे (Atmanirbhar Bharat Yojana) हे लोन दिले जाते. सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याचे आदेश दिले होते. 

शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले 58 हजार कोटी...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आतापर्यंत कोरोना संकटाच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के जास्त गहू खरेदी केला आहे. या गव्हाचे जवळपास 58 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले आहेत.  

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी