नवी दिल्ली : येत्या वर्षअखेरपर्यंत १0 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम-किसान) योजनेत सामावून घेतले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शुक्रवारी सांगितले. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला एका वर्षात ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांत दिले जाणार आहेत.तोमर यांनी सांगितले की, ५.८८ कोटी छोट्या शेतकºयांना आतापर्यंत २ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला असून, ३.४0 कोटी शेतकºयांना दुसरा हप्ता मिळाला आहे. तोमर यांनी सांगितले की, प. बंगालवगळता सर्व राज्ये या योजनेत सहभागी आहेत. योजनेची प्रगती आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. वर्षअखेरपर्यंत १0 कोटी शेतकºयांना योजनेत सामावून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व १४.५ कोटी शेतकºयांना योजनेत सहभागी करून घेण्यात येईल. या योजनेला जमीनधारणेची कोणतीही मर्यादा नाही.खर्च होतील ८७ हजार कोटी२0१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी २४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे योजनेची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या १२.५ कोटी छोट्या व मध्यम शेतकºयांनाच या योजनेचा लाभ देण्याचे ठरले होते. नंतर आणखी २ कोटी शेतकºयांना योजनेत सहभागी करून घेण्यात आले. २0१९-२0 या वर्षात या योजनेवर ८७,२१७.५0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पीएम-किसान योजनेत वर्षअखेरपर्यंत 10 कोटी शेतकऱ्यांना सामावून घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 2:12 AM