मुंबई: देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. याशिवाय त्यांच्याकडून परिस्थितीची माहितीदेखील घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यांनी उचललेल्या पावलांचं मोदींनी कौतुक केलं. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. याबद्दलचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना दिला. 'आम्ही पूर्ण लक्ष कोरोनाचा प्रसार थांबवण्यावर केंद्रित केलं आहे. पूर्वी चाचणी कमी होत असल्यानं रुग्णांची संख्या कमी होती, त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांनाही चाचणीची परवानगी दिल्यानं व त्यांचं २-३ दिवसांचं निदान एकत्रितरीत्या हाती येत असल्यानं रुग्णांची संख्या वाढली आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी मोदींना सांगितलं.सर्व धर्माच्या धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी करू नये तसंच सामाजिक अंतर पाळावं असं आवाहन करणं गरजेचं असल्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरेंनी केली. त्यांच्या या सूचनेचा विशेष उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी संवाद साधून तसं आवाहन करण्यास सांगितलं.
CoronaVirus: लहान भावाची 'ती' सूचना मोठ्या भावानं ऐकली; देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 7:33 PM