पंतप्रधान मोदींनी लष्करी गुपिते फोडून देशद्रोह केला; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 05:32 AM2019-02-13T05:32:07+5:302019-02-13T05:32:40+5:30

हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्याआघीच त्याची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना कळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय गोपनीय कायद्याचा भंग करीत देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला.

PM Modi acted like a spy, says Rahul Gandhi in new Rafale attack | पंतप्रधान मोदींनी लष्करी गुपिते फोडून देशद्रोह केला; राहुल गांधींचा घणाघात

पंतप्रधान मोदींनी लष्करी गुपिते फोडून देशद्रोह केला; राहुल गांधींचा घणाघात

googlenewsNext

नवी दिल्ली : हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्याआघीच त्याची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना कळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय गोपनीय कायद्याचा भंग करीत देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. स्वत:ला चौकीदार म्हणविणाऱ्या मोदींवर या महाभयंकर गुन्ह्याबद्दल खटला चालवून त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी हा आरोप केला तेव्हा, तुम्ही किंवा तुमचा पक्ष यासंदर्भात पोलिसांत औपचारिक फिर्याद करणार का, असे त्यांना विचारले गेले. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, आम्ही हा विषय जनतेच्या न्यायालयात नेऊ. तेथे त्याचा नक्की फैसला होईल. आम्ही निवडून आल्यावर आमचे सरकार याचा नक्कीच कायदेशीर पाठपुरावा करेल.
राहुल गांधी यांच्या या आरोपाचा संदर्भ ‘इंडियन एक्स्प्रेस’ दैनिकाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताशी होता. राफेल करार होण्याच्या काही दिवस आधी अनिल अंबानी यांनी पॅरिसला जाऊन या होऊ घातलेल्या कराराच्या अनुषंगाने फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाºयांशी चर्चा केल्याचे ते वृत्त होते. त्यात विमाने बनविणाºया एका कंपनीने असा करार होणार असल्याचे अंबानी यांनी कळविल्याचा ई-मेल पाठविल्याचाही उल्लेख होता.
ताज्या घटनाक्रमाने राफेल घोटाळयाचा तिसरा पैलू समोर आला आहे. आधी नियमाला सोडून केलेले व्यवहार व वशिलेबाजीचा मुद्दा होता. आता त्याला गोपनीयता भंग करण्याचीही जोड मिळाली आहे, असेही गांधी म्हणाले.
राफेलविषयी ‘कॅग’ने दिलेला अहवाल ‘निरर्थक’ आहे, असे म्हणून गांधी यांनी त्या अहवालाचे वर्णन ‘चौकीदाराच्या आॅडिटर जनरलचा रिपोर्ट’, असे केले.

रिलायन्स म्हणते
तो करार राफेलशी संबंधित नाही
राहुल गांधी यांनी मोदी अंबानींचे दलाल म्हणून काम करीत असल्याचा आरोप करताना ज्या ई-मेलचा दाखला दिला त्याचा राफेल विमान खरेदी व्यवहाराशी काहीही संबंध नाही, असा खुलासा अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने केला. एका निवेदनात कंपनीने म्हटले की, ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमानुसार भारतात लष्करी व नागरी हेलिकॉप्टरचे एकत्रितपणे उत्पादन करण्याविषयी एअरबस आणि आमची कंपनी यांच्यात जी चर्चा सुरू होती, त्यासंबंधीचा तो ई-मेल होता.

हेर जे काम करतात ते मोदींनी केले

या कथित ई-मेलची प्रत पत्रकारांना दाखवत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, यावरून पंतप्रधान मोदी जणू अनिल अंबानी यांचे दलाल म्हणून काम करीत होते, असे दिसते. त्यांनी होणाºया कराराची माहिती अंबानी यांना आधीच दिली म्हणूनच ते पॅरिसला गेले. हेर जे काम करतात ते मोदींनी केले आहे. पण ते करताना त्यांना पंतप्रधानपदाच्या शपथेचा विसर पडला. त्यांनी देशाच्या संरक्षणासंबंधीची माहिती खासगी व्यक्तीला आधीच देऊन गोपनीयतेचा भंग केला. हे कृत्य देशद्रोहाहून कमी नाही.

Web Title: PM Modi acted like a spy, says Rahul Gandhi in new Rafale attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.