नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (9 जानेवारी) प्रवासी भारतीय संमेलनाचं उद्घाटन केले. या संमेलनाच्या निमित्तानं जमलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. या संमेलनात 23 देशांचे 124 खासदार आणि 17 महापौर सहभागी झाले.
'देशाच्या आर्थिक प्रगतीत प्रवासी भारतीयांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रवासी भारतीय आमच्या देशातील स्थायी ब्रँड अॅम्बेसिडर आहेत', असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. पुढे ते असेही म्हणाले की, 'परदेशात राहणा-या भारतीयांच्या मनातून भारत कधीही गेला नाही. आज तुम्हाला येथे पाहून तुमच्या पूर्वजांना जेवढा आनंद होत आहे, याची कल्पना आम्हाला आहे. आज ते जेथे कोठे असतील तुम्हाला पाहून नक्कीच खूश असणार. येथून जे कुणी परदेशात गेलेत त्यांच्या मनातून भारत कधीही गेला नाही. भारतीय वंशाचे नागरिक जेथे कोठेही गेले तेथील संस्कृती, सिनेमे, खाद्यपदार्थ, सर्वकाही स्वीकारले, मात्र भारतीय संस्कृतीदेखील सदैव जीवंत ठेवली आहे. आता प्रत्येक कामाची गती आधीपेक्षा दुप्पट झाली आहे आणि जीएसटीमुळे टॅक्सचं जाळदेखील संपलं आहे.'
भारताच्या ग्लोबल रँकिंगमध्ये सुधारणालोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि भारतातील व्यावसायिक वातावरणात सुधारणा होत आहे. आज वर्ल्ड बँक, मूडीजसारख्या संस्थांनी भारताचा व्यवहार पाहत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, भारताचे ग्लोबल रँकिंग सुधारत आहे.
आम्ही योग दिनाचा प्रस्ताव ठेवला, जो संपूर्ण जगानं स्वीकारला मोदी यावेळी असेही म्हणाले की, आम्ही योग डेचा प्रस्ताव ठेवल्यानंतर संपूर्ण जगानं त्याचा स्वीकार केला. 21 जूनला संपूर्ण विश्व योग दिन साजरा करते, ही बाब आमच्यासाठी गौरवास्पद आहे.
सुषमा स्वराजांच्या कार्याचं कौतुकआमचे परराष्ट्र मंत्रालय 24 तास व सातही दिवस लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध असते,असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्याचं जाहीर कौतुक केले. भारताच्या विकासाच्या प्रयत्नांमध्ये आम्ही प्रवासी भारतीयांना आपला सहकारी मानतो. अर्थव्यवस्था, पर्यटन यांमध्ये प्रवासी भारतीयांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे.