नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांसोबत संवाद साधत आहेत. मन की बात या कार्यक्रम हा 46 वा भाग आहे. दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात. दरम्यान, आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमा दासच्या कामगिरीबाबत मन की बात कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक केले. जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या हिमा दासने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. टॅ्क प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. हिमाव्यतिरिक्त त्यांनी दिव्यांग खेळाडू एकता, योगेश कठुनिया आणि सुंदर सिंह गुर्जर यांचंहीअभिनंदन केले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे. आपण आपल्या कर्तृत्वानं देशाचे नाव उंचावलंय, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.
- 'सुवर्णकन्या' हिमा दासचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक