शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसच्या 'न्याय'ला टक्कर देण्यासाठी भाजपाचं 'संकल्पपत्र' जाहीर  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 12:11 PM

भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे.

नवी दिल्ली : आमागी लोकसभा निवडणुकीसाठीभाजपा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. यावेळी नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

भाजपाने सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यावर विचार करुन 'संकल्पपत्र' तयार करण्यात आले आहे.   

भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून जवळपास 7500 सूचना पेट्या, 300 रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे.  दरम्यान, गेल्या 2 एप्रिल रोजी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली होती.

भाजपाच्या 'संकल्पपत्रा'तील महत्वाचे मुद्दे ...

- 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही- सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार.- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार - दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी- छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार- प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य- सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाणार- तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार-सिटीजनशिप विधेयक लागू करणार- सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार- समान नागरी कायदा लागू करणार.- देशातील छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार- सन २०२२ पर्यंत देशभरातील सर्वच रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करणार- कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध - 5 किमी अंतरात बँकिंग सुविधा करणार- सरकारी प्रक्रिया, कामकाज संपूर्ण डिजिटल करण्यावर जोर- कलम 35-अ हटवण्यासाठी प्रयत्न करणार- 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करणार- कुपोषणाचा स्तर घटवणार- आरोग्य सेवा घराच्या दाराशी पोहोचावी अशी व्यवस्था करणार- सर्व घरांत शौचालय असेल यावर काम करणार- सर्वांना घर मिळावे यासाठी संकल्पबद्ध- सर्वांना घरगुती गॅस उपलब्ध करून देणार- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार- नल सें जल यावर काम करणार- दुष्काळ, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय बनवणार

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९