PM मोदी अन् राहुल गांधी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणार, लवकरच बैठक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:45 IST2025-02-14T17:44:31+5:302025-02-14T17:45:03+5:30
देशाचे विद्यमान निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2025 ला संपत आहे.

PM मोदी अन् राहुल गांधी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणार, लवकरच बैठक...
Chief Election Commissioner: देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार येत्या 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे लवकरच नवीन व्यक्तीची या पदावर निवड होणार आहे. यासाठी कायदे मंत्रालयाने 17 फेब्रुवारी 2025 रोजी तीन सदस्यीय समितीची बैठक बोलावली आहे. निवड समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
राजीव कुमारांची 2022 मध्ये नियुक्ती
राजीव कुमार यांची मे 2022 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने 2024 मध्ये लोकसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. याशिवाय एका दशकाहून अधिक काळानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त(नियुक्ती, अटी आणि कार्यकाळ) कायदा, 2023 च्या तरतुदी CEC च्या नियुक्तीसाठी प्रथमच लागू केल्या जात आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या. 2023 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या होत्या. जानेवारी 2025 मध्ये दिल्ली निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना राजीव कुमार यांनी त्यांच्या निवृत्ती योजनेबद्दल सांगितले होते. गेल्या 13-14 वर्षांपासून कामामुळे वेळ मिळत नसल्याचे त्यांनी विनोदी स्वरात सांगितले. तसेच, निवृत्तीनंतर चार-पाच महिने हिमालयात जाऊन एकांतात ध्यान करणार असल्याचेही ते म्हणाले होते.