शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

Coronavirus: अनाथ मुलांसाठी मोदी सरकारचा पुढाकार; पीएम केअर्स फंडातून १० लाखांच्या मदतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 7:51 PM

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देअनाथ मुलांसाठी PM मोदींचा पुढाकारपीएम केअर्स फंडातून १० लाखांच्या मदतीची घोषणाआयुषमान योजनेअंतर्गत मोफत विमा

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर किंचित कमी होताना पाहायला मिळत आहे. देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना पाहायला मिळत असली, तरी मृत्यूंचे वाढलेले प्रमाण चिंतेत भर टाकणारे ठरत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे अनेक जण अनाथ झाले आहेत. कोरोनाने पालकांचे छत्र हिरावून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. (pm modi announced all children who have lost parents due to corona will be supported under PM CARES Children scheme)

कोरोना संकटामुळे हजारो मुले अनाथ झाली आहेत. काही जणांनी एक पालक गमावला आहे, तर काही जणांनी दोन्ही पालक गमावले आहेत. आता या अनाथ मुलांचे पालनपोषण, शिक्षण यांचा मोठा प्रश्न समाजासमोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना आणली असून, या माध्यमातून अनाथ मुलांसाठी १० लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुले ही देशाचे भविष्य आहेत. यासाठी त्यांच्या मदतीसाठी सर्वकाही करण्यात येईल. समाज म्हणून या मुलांकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

WHO चा इशारा! ‘इतके’ टक्के लसीकरण आवश्यक; तरच होईल कोरोनाचे संकट दूर

आयुषमान योजनेअंतर्गत मोफत विमा

ज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा सांभाळकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत, अशा सर्व मुलांना १८ वर्षांचे झाल्यानंतर स्टायपेंड म्हणजे निश्चित रक्कम देण्यात येईल. तसेच ही मुले २३ वर्षांची झाल्यानंतर पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय या सर्व मुलांना आयुषमान योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा विमा मोफत उपलब्ध करून दिला जाणार असून, १८ वर्षांपर्यंत याचे सर्व हप्ते पीएम केअर्स फंडातून भरले जातील, असेही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 

आमचे पैसे कुठेयत, पेट्रोल ३० रुपयांना कधी मिळणार?; बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार

शिक्षणासाठीही पीएम केअर्समधून मिळणार मदत

तसेच दोन्ही पालकांचे छत्र हरवल्यामुळे जी मुले अनाथ झाली आहेत. त्यांना मोफत शिक्षण दिले जाणार असून, उच्च शिक्षणासाठी पीएम केअर्स फंडातून मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षणासाठी लागणाऱ्या कर्जाचे हप्ते पीएम केअर्स फंडातून भरले जातील, असेही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार