नवी दिल्ली: स्वातंत्र्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. या भाषणात मोदींनी पेयजल सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत जल जीवन मिशनची घोषणा केली. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच जल जीवन मिशनदेखील जन चळवळ व्हावी, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. पुढील पिढ्यांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. आज देशातील निम्म्याहून अधिक घरांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ स्वच्छ पाणी मिळवण्यात जातो. त्यामुळे सरकारनं प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे, असं मोदी म्हणाले. येणाऱ्या दिवसांमध्ये जल जीवन मिशनला पुढे घेऊन जाऊ. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं सोबत काम करतील. यासाठी सरकारकडून साडे तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मोदींनी दिली.
Independence Day: जाणून घ्या काय आहे 'जल जीवन मिशन'?; मोदी सरकार खर्च करणार 3.5 लाख कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:01 AM