एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटानं ऑस्करवर आपलं नाव लिहित संपूर्ण देशाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. भारताच्या 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग्सचा पुरस्कार पटकावत देशाचं नाव उंचावलं. सर्वच भारतीय हा आनंद साजरा करत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'आरआरआर'च्या टीमला कौतुकाची थाप दिली आहे.
'नाटू नाटू' या गाण्यानं ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे. कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला ऑस्कर मिळाल्याची घोषणा व्यासपीठावरून झाली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कौतुक करत म्हणाले, 'एक्सेप्शनल! नाटू नाटू गाण्याची लोकप्रियता जगभरात पसरली आहे. पुढील अनेक वर्ष हे गाणं लोकांच्या स्मरणात राहील. हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावल्याबद्दल एमएम कीरावानी, चंद्रबोस आणि संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.'
'किती सुंदर दिसतेय...' कंगनाने केलं दीपिकाचं तोंडभरुन कौतुक; म्हणाली, 'तिथे उभं राहणं...'
RRR सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने इतर सर्व हॉलिवूड गाण्यांवर मात करत हा पुरस्कार पटकावला. यासह गाण्याने इतिहासच रचला आहे. आधी गोल्डन ग्लोब आणि आता थेट ऑस्कर पुरस्कार पटकावल्याने RRR च्या टीमचे जगभरात कौतुक होत आहे. गाण्यातील ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि रामचरण (Ramcharan) यांची डान्स स्टेपही प्रचंड गाजली. ऑस्कर सोहळ्याच्या स्टेजवर हे गाणं गात प्रेक्षकांकडून गाण्याला स्टॅंडिंग ओव्हेशनही मिळालं. आजचा दिवस खरोखरंच सर्व भारतीयांच्या लक्षात राहणारा आहे हे नक्की.