ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी सरकार, लष्कर आणि विरोधी पक्ष चांगलेच सैरभैर झाले असून त्या धक्क्यातून पाकिस्तान अजून सावरलेलं नाही. पाकिस्तान पिपल्स पक्षाचे नेते बिलावर भुट्टो यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अवमानकारक शब्दांचा वापर केला आहे
पंतप्रधान मोदी हे गुजरात आणि काश्मीरचे कसाई आहेत.मोदींसोबत कोणताच करार करणं शक्य नाही. महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी पाकिस्तानविरोधी विधान करतात, आम्ही काश्मीरच्या जनतेच्या अधिकारांसाठी लढत आहोत असंही भुट्टो म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्यावरही त्यांनी टीका केली असून शरीफ यांच्यामुळेच पाकिस्तान कमकुवत झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.