काँग्रेस सैनिकांच्या शौर्याला कमी लेखत राहिली; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:30 PM2023-02-12T18:30:16+5:302023-02-12T18:31:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी राजस्थानमधील दौसा येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या सोहना-दौसा विभागाचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी राजस्थानमधील दौसा येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या सोहना-दौसा विभागाचे उद्घाटन केले. यावेळी एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केल्यानंतर पक्षाने धनावद येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत बिगुल वाजवला. जाहीर सभेत उपस्थित असलेल्या गर्दीकडे बोट दाखवत पंतप्रधान म्हणाले की हा ट्रेलर आहे, चित्रपट अजून रिलीज व्हायचा आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांनी राजस्थानमधील गेहलोत सरकारवर टीका केली.
'राज्यात डबल इंजिन सरकारची गरज असल्याचे सांगितले. यावेळी, पंतप्रधानांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जुन्या अर्थसंकल्पाच्या वाचनाची खिल्ली उडवली आणि म्हटले की काँग्रेसकडे कोणतेही व्हिजन नाही.
'अनेक दशकांपासून काही लोकांनी राजस्थानला आजारी राज्य म्हणत छेडले आहे, पण भाजप राजस्थानला विकसित भारताचा सर्वात मजबूत आधार बनवत आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Ashok Gehlot: “राहुल गांधी एक जननायक आहेत, पंतप्रधान मोदींसमोर केवळ तेच असल्याचे देशाने मान्य केलेय”
'केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जोधपूरचे खासदार गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, राज्यसभा खासदार किरोडीलाल मीना आणि जसकौर मीना यांच्याशिवाय नेत्या वसुंधरा राजे, सतीश पुनिया हे देखील या कार्यक्रमात उपस्थीत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे घडले त्याची सर्वत्र चर्चा आहे. मला 40 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतो. तेव्हा राजकारणात नव्हतो. राष्ट्रीय स्वयं संघात काम करायचो. एके दिवशी काम करून परत आल्यावर मित्राने विचारले जेवणाची काय व्यवस्था आहे. त्यावर मी स्थलांतरावरून परतत असल्याचे सांगितले. आंघोळ करणे बाकी आहे. त्यावर त्यांनी सांगितले की, एका सोबतच्या स्वयंसेवकाच्या घरी लग्नाचे निमंत्रण आहे, तिथे जाऊन जेवण करा. ते मला स्वयंसेवकाच्या घरी घेऊन गेले. ज्यांच्या घरी लग्न होते ते शिंपी होते आणि घराबाहेर काम करत होते. मी त्याला नमस्कार केला आणि बघितले की लग्नाचे वातावरण नव्हते.
'सहकारी स्वयंसेवक आत गेला आणि विचारले की आज लग्नाचे आमंत्रण आहे का? यावर शिंप्याच्या जोडीदाराने सांगितले की, लग्न गेल्या वर्षीच झाले होते. त्यावर त्यांनी निमंत्रण पत्रिका काढली आणि तारीख पाहिली असता त्यात गेल्या वर्षीच्या त्याच दिवसाची तारीख लिहिली होती. मी आश्चर्यचकित झालो. न जेवता परत आलो. मात्र, याचा राजस्थानशी काहीही संबंध नाही. पण, जुनी गोष्ट आठवली म्हणून सांगावं वाटलं, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला.