PM Modi Files Nomination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी माता गंगेचे पूजन आणि कालभैरवाचेही दर्शन घेतले. मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, एकनाथ शिंदे, आदी अनेक नेते उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की, यापेक्षा मोठे भाग्य काय असू शकते...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
सोशल मीडियावर दशाश्वमेध घाटाचा व्हिडिओ शेअर करताना पीएम मोदींनी लिहिले की, “आज माझ्या दिवसाची सुरुवात माता गंगेच्या प्रार्थनेनं झाली. माता गंगेचे दर्शन घेण्याहून मोठे भाग्य काय असू शकते? देशभरातील माझ्या कुटुंबीयांना सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळावे, यासाठी मी माता गंगेकडे प्रार्थना केली."
दरम्यान, आज(14 मे) गंगा सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर पीएम मोदींनी सकाळी दशाश्वमेध घाटावर प्रथम गंगेची पूजा केली. यानंतर त्यांनी यांनी दशाश्वमेध घाटापासून आदिकेशव घाटापर्यंत क्रूझने गंगा दर्शन केले आणि शेवटी नमो घाटावर उतरले. या गंगा दर्शनानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.