'ज्यांची स्वतःची हमी नाही त्यांच्यापासून सावधान'; मध्य प्रदेशातून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 05:03 PM2023-07-01T17:03:04+5:302023-07-01T17:03:23+5:30
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशमध्ये जाहीर सभा घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील शहडोल येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्यासाठी आदिवासी हा केवळ मतदार नाही. आज राणी दुर्गावतीजींच्या पवित्र भूमीवर तुम्हा सर्वांमध्ये येण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. राणी दुर्गावतीजींच्या चरणी माझी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या प्रेरणेने आज सिकलसेल अॅनिमिया मुक्ती मिशन मोहीम सुरू होत आहे.
पंतप्रधान म्हणाले, आज मध्य प्रदेशातील १ कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड देखील दिले जात आहेत. या दोन्ही प्रयत्नांचा सर्वात मोठा फायदा आपल्या गोंड समाज, भिल्ल समाज आणि इतर आदिवासी समाजातील लोकांना होतो.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देश एक मोठा संकल्प घेत आहे. आदिवासी बांधवांचे जीवन सुरक्षित करण्याचा हा संकल्प आहे. पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी आदिवासी समाजातील लोकांमध्ये वेळ घालवला आहे. सिकलसेल अॅनिमियापासून वाचवण्याची ही प्रतिज्ञा आहे. दरवर्षी सिकलसेल अॅनिमियाच्या विळख्यात येणाऱ्या अडीच लाख मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवण्याचा हा संकल्प आहे.
'अपघातात मृत्यू झाल्यास लोक म्हणतात देवेंद्रवासी झाला..'; अपघातावरुन पवारांची फडणवीसांवर टीका
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी देशातील विविध भागात आदिवासी समाजात बराच काळ घालवला आहे. सिकलसेक अॅनिमिया सारखा आजार खूप वेदनादायक असतो. हा आजार कुटुंबांनाही विखुरतो. हा आजार पाण्याने पसरत नाही, हवा किंवा अन्नानेही पसरत नाही. हा आजार अनुवांशिक आहे, याचा अर्थ हा आजार फक्त पालकांकडूनच मुलामध्ये येतो. संपूर्ण जगात 'सिकल सेल अॅनिमिया'च्या निम्म्या केसेस एकट्या आपल्या देशात आहेत. पण गेल्या 70 वर्षात त्याची कधीच काळजी नव्हती हे दुर्दैव आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोणतीही ठोस योजना आखण्यात आली नाही. मात्र आदिवासी समाजाचे हे सर्वात मोठे आव्हान सोडविण्याचे काम आता आपल्या सरकारने हाती घेतले आहे. आपल्यासाठी आदिवासी समाज हा केवळ सरकारी व्यक्ती नसून आपल्यासाठी संवेदनशीलतेचा विषय आहे, भावनिक बाब आहे.