PM Modi Tulsi Gabbard Latest News: अमेरिकेची गुप्तचर यंत्रणेच्या संचालक तुलसी गबार्ड भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी (१७ मार्च) पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी तुलसी गबार्ड यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गबार्ड यांना खास भेटवस्तू दिली. तर गबार्ड यांनीही मोदींना भेटवस्तू दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तुलसी गबार्ड यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच पार पडलेल्या महाकुंभ काळातील गंगेचं पाणी भेट म्हणून दिलं. एका पितळाच्या कमंडलूमध्ये हे पाणी होतं. पाणी भेट देण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी हे पाणी गंगेचं असून, त्याचं धार्मिक महत्त्वही गबार्ड यांना सांगितलं.
मोदींना तुळशीच्या मण्यांची माळ
तुलसी गबार्ड यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू दिली. तुळशीच्या मण्याची माळ एका छोट्या लाकडी पेटीत होती. ती गबार्ड यांनी मोदींना भेट दिली.
"अलिकडेच जो महाकुंभ झाला. ४५ दिवस चाललेल्या या कुंभमेळ्यात देशातील ६६ कोटी लोकांनी पवित्र स्नान केलं. मी सुद्धा गेलो होतो. त्यावेळचे हे गंगेचे पाणी आहे", असे पंतप्रधान मोदी तुलसी गबार्ड यांच्याकडे कलश देताना म्हणाले.
मोदी गंगेचं पाणी भेट दिल्यानंतर तुलसी गबार्ड यांनी आभार मानले. त्यानंतर "संचालक झाल्यानंतर माझ्याकडून तुमच्यासाठी तुळशीची माळ तुमच्यासाठी भेट आहे", असे त्या म्हणाल्या.
तुलसी गबार्ड यांचे रविवारी (१६ मार्च) सकाळी भारत आगमन झाले. त्यांची गुप्तचर सहकार्य, सायबर सुरक्षा आणि संरक्षण संबंध याविषयावर भारतीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही त्यांनी भेट घेतली. दिल्लीत झालेल्या या बैठकीवेळी त्यांनी बंदी असलेल्या खलिस्तानी संघटना सिख फॉर जस्टिसकडून अमेरिकेमध्ये भारतविरोधी कटकारस्थाने केली जात असल्याचा मुद्दा अधोरेखित केला.