नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा काही प्रदेश चीनला देऊन टाकला, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. भारत व चीन यांनी पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे बोलाविण्यासंदर्भात नुकताच एक करार केला. त्यावर राहुल गांधी यांनी कोरडे ओढले. मात्र, हे सर्व आरोप केंद्राने फेटाळले आहेत.राहुल गांधी म्हणाले, चीनबरोबर झालेल्या कराराची माहिती देताना राजनाथसिंह स्वत: संकोचले होते. भारतीय फौजा आता पूर्व लडाखमध्ये फिंगर ३ याठिकाणी तैनात करण्यात येतील, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. फिंगर ४ हे ठिकाण भारतीय हद्दीमध्ये येते. पूर्वी तिथे भारतीय लष्कराची चौकी होती. सरकार देपसांग प्रदेशाबद्दल पुढच्या फेरीत चर्चाभारताने आपला कोणताही भूभाग चीनला दिलेला नाही. यासंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेले आरोप देपसांग प्रदेशासहित अजूनही प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे.पूर्व लडाखमधील भारताची हद्द फिंगर ४ पर्यंत आहे, असे करण्यात आलेले विधान दिशाभूल करणारे आहे. भारताचा भूभाग कोणता हे देशाच्या नकाशात सुस्पष्टपणे दाखविले आहे.भारताचा ४३ हजार कि.मी.पेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्रदेश चीनने १९६२ सालापासून बळकाविला आहे, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.चूक काँग्रेसला उमगली : भाजपपंडित नेहरू यांनी चीनला भारताचा ३८ हजार चौरस कि.मी.चा प्रदेश देऊन टाकला. त्या हिमालयाएवढ्या चुकीची काँग्रेसला आता नक्कीच जाणीव झाली असेल, अशी कोपरखळी भाजपचे सरचिटणीस सी.टी. रवी यांनी राहुल गांधी यांना मारली. मोदींनी चीनला भारताचा भूभाग देऊन टाकला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला भाजपने हे प्रत्युत्तर दिले.
मोदींनी भारताचा भूभाग चीनला देऊन टाकला; राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 6:19 AM