'लूट अन् फूट काँग्रेससाठी ऑक्सिजन', PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 03:24 PM2024-02-11T15:24:17+5:302024-02-11T15:29:22+5:30

PM Modi Rally In Jhabua: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

PM Modi In Jhabua Live: 'Oxygen for Loot and Foot Congress', PM Modi Blows Lok Sabha Trumpet | 'लूट अन् फूट काँग्रेससाठी ऑक्सिजन', PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

'लूट अन् फूट काँग्रेससाठी ऑक्सिजन', PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

PM Modi In Jhabua: लोकसभा निवडणूक 2024 ला (Lok Sabha Election 2024) फक्त दोन महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपनेही निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पंरप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज मध्य प्रदेशातील झाबुआ येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी 7,550 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.

काँग्रेसवर जोरदार टीका
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, झाबुआ जितका मध्य प्रदेशशी जोडलेला आहे, तितकाच गुजरातशी जोडलेला आहे. काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले, मध्य प्रदेशने गेल्या काही वर्षांत दोन वेगवेगळे टप्पे पाहिले आहेत. एक डबल इंजिन सरकारचे युग आणि दुसरे काँग्रेसच्या काळातील डार्क जग. काँग्रेससाठी लूट आणि फूट, हेच ऑक्सिजन होते. मी असे ऐकले आहे की, मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे. काँग्रेस आता आपल्या पापाच्या दलदलीत अडकली आहे. ती यातून बाहेर पडण्याचा जितका प्रयत्न करेल तितकी ती आणखी बुडेल. 

यांनी सत्तेत असताना लुटले, आता सत्तेतून बाहेर पडल्यावर भांडणे लावायचे काम करत आहे. हे बंद होताच काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद ढासळू लागते. आज विकासाच्या वाटेवर वेगाने धावणाऱ्या मध्यप्रदेशची पूर्वी देशातील सर्वात आजारी राज्यांमध्ये गणना व्हायची. विरोधकांसाठी आदिवासी समाज व्होटबँक होती, पण आमच्यासाठी अभिमान आहे. तुमची स्वप्ने, तुमच्या मुलांची स्वप्ने... हा मोदींचा संकल्प आहे, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

काय आहे भाजपची रणनीती?
पंतप्रधान पुढे म्हणाले, राज्यात येण्यापूर्वी मी पाहिले की, माझ्या दौऱ्याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. पण, मी आज प्रचारासाठी आलो नाही, तर सर्व खासदारांचे आभार मानण्यासाठी आलो आहे. लोकसभेसाठी तुमचा मूड कसा असेल, हे तुम्ही मध्य प्रदेश विधानसभेच्या निकालावरुन आधीच सांगितले आहे. त्यामुळेच यावेळी विरोधी पक्षातील बडे नेतेही म्हणू लागले आहेत की, 2024 मध्ये भाजप 400 चा आकडा पार करेल आणि पुन्हा एकदा मोदी सरकार येईल.

कार्यकर्त्यांना उद्देशून मोदी म्हणाले, एनडीए 400 चा आकडा पार करेल, यात भाजपला 370 पेक्षा जास्त जागा एकट्याने मिळवायच्या आहेत. प्रत्येकाने आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मागच्या तीन निवडणुकांमध्ये भाजपला किती मते मिळाली, हे तपासावे. यावेळी भाजपला मागच्या वेळेस मिळालेल्या मतांपेक्षा 370 जास्त मते मिळवायची आहेत. हे करण्यात यश आल्यास भाजप स्वबळावर लोकसभेच्या 370 पेक्षा जास्त जागा मिळवेल, असा विजयमंत्री मोदींनी कार्यकर्यांना दिला.
 

Web Title: PM Modi In Jhabua Live: 'Oxygen for Loot and Foot Congress', PM Modi Blows Lok Sabha Trumpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.