शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

'लूट अन् फूट काँग्रेससाठी ऑक्सिजन', PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 3:24 PM

PM Modi Rally In Jhabua: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

PM Modi In Jhabua: लोकसभा निवडणूक 2024 ला (Lok Sabha Election 2024) फक्त दोन महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपनेही निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पंरप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज मध्य प्रदेशातील झाबुआ येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी 7,550 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.

काँग्रेसवर जोरदार टीकायावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, झाबुआ जितका मध्य प्रदेशशी जोडलेला आहे, तितकाच गुजरातशी जोडलेला आहे. काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले, मध्य प्रदेशने गेल्या काही वर्षांत दोन वेगवेगळे टप्पे पाहिले आहेत. एक डबल इंजिन सरकारचे युग आणि दुसरे काँग्रेसच्या काळातील डार्क जग. काँग्रेससाठी लूट आणि फूट, हेच ऑक्सिजन होते. मी असे ऐकले आहे की, मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे. काँग्रेस आता आपल्या पापाच्या दलदलीत अडकली आहे. ती यातून बाहेर पडण्याचा जितका प्रयत्न करेल तितकी ती आणखी बुडेल. 

यांनी सत्तेत असताना लुटले, आता सत्तेतून बाहेर पडल्यावर भांडणे लावायचे काम करत आहे. हे बंद होताच काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद ढासळू लागते. आज विकासाच्या वाटेवर वेगाने धावणाऱ्या मध्यप्रदेशची पूर्वी देशातील सर्वात आजारी राज्यांमध्ये गणना व्हायची. विरोधकांसाठी आदिवासी समाज व्होटबँक होती, पण आमच्यासाठी अभिमान आहे. तुमची स्वप्ने, तुमच्या मुलांची स्वप्ने... हा मोदींचा संकल्प आहे, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

काय आहे भाजपची रणनीती?पंतप्रधान पुढे म्हणाले, राज्यात येण्यापूर्वी मी पाहिले की, माझ्या दौऱ्याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. पण, मी आज प्रचारासाठी आलो नाही, तर सर्व खासदारांचे आभार मानण्यासाठी आलो आहे. लोकसभेसाठी तुमचा मूड कसा असेल, हे तुम्ही मध्य प्रदेश विधानसभेच्या निकालावरुन आधीच सांगितले आहे. त्यामुळेच यावेळी विरोधी पक्षातील बडे नेतेही म्हणू लागले आहेत की, 2024 मध्ये भाजप 400 चा आकडा पार करेल आणि पुन्हा एकदा मोदी सरकार येईल.

कार्यकर्त्यांना उद्देशून मोदी म्हणाले, एनडीए 400 चा आकडा पार करेल, यात भाजपला 370 पेक्षा जास्त जागा एकट्याने मिळवायच्या आहेत. प्रत्येकाने आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मागच्या तीन निवडणुकांमध्ये भाजपला किती मते मिळाली, हे तपासावे. यावेळी भाजपला मागच्या वेळेस मिळालेल्या मतांपेक्षा 370 जास्त मते मिळवायची आहेत. हे करण्यात यश आल्यास भाजप स्वबळावर लोकसभेच्या 370 पेक्षा जास्त जागा मिळवेल, असा विजयमंत्री मोदींनी कार्यकर्यांना दिला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक