PM Modi Interview Live : भारत-चीन सीमा वाद आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण न दिल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. "संबंधित मंत्रालयांद्वारे विस्तृत स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. जेव्हा गरज होती तेव्हा आम्हीदेखील काही विषयांवर बोलत होतो," असं मोदी म्हणाले. एनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत, ना ते कोणाचं ऐकतात ना ते सभागृहात बसतात असं वक्तव्य केलं.
"संसदेत आम्ही चर्चेचं स्वागत करतो. मी आणि आमचं सरकार कोणावरही निशाणा साधत नाही, आम्ही चर्चेवर विश्वास ठेवतो. कोणावर निशाणा साधण्याची भाषा मी जाणत नाही आणि हे माझ्या स्वभावातही नाही. परंतु तर्क आणि तथ्यांच्या आधारावर माध्यमं काही वाद भडकावण्यासाठी सभागृहात माझ्या शब्दांची व्याख्या करू शकतात," असं मोदी म्हणाले.