तामिळनाडूमध्ये रामाच्या नावावर सर्वाधिक गावे; उत्तर-दक्षिण वादावर पीएम मोदी स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:03 PM2024-04-15T22:03:43+5:302024-04-15T22:04:36+5:30
'काँग्रेसशी अशी काय मजबुरी, सनातनच्या विरोधात विष पेरणाऱ्यांसोबत बसलात.'
PM Modi Interview: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (15 एप्रिल) वृत्तसंस्था एएनआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राजकारणातील उत्तर आणि दक्षिण भारताच्या विभाजनाबाबत मत व्यक्त केले. तामिळनाडूसह दक्षिण भारतातील नेत्यांच्या वक्तव्याचा पीएम मोदींनी खरपून समाचार घेतला. तसेच, भारत हा विविधतेने नटलेला देश असल्याची प्रतिक्रिया दिली.
'माझा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे...', लोकसभेपूर्वीच मोदींनी सुरू केली तिसऱ्या टर्मची तयारी
भारतात रामाचे नाव जोडलेली सर्वाधिक गावे तामिळनाडूत आहेत. अनेक गावांची नावे आहेत, ज्यात राम नाव जोडले आहे. आता तुम्ही ते वेगळे कसे करणार? हीच भारताची खरी विविधता आहे. नागालँडचा माणूस पंजाब्यांसारखा नसतो, काश्मीरचा माणूस गुजरात्यांसारखा नसतो. विविधता ही आपली ताकद आहे, ती आपण साजरी केली पाहिजे. भारताच्या गुलदस्त्यात प्रत्येकाला आपले फूल दिसावे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे.
सनातनविरोधी वक्तव्यावर म्हणाले...
मुलाखतीदरम्यान पीएम मोदींनी तामिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या नेत्यांच्या सनातनविरोधी वक्तव्यांवरही निशाणा साधला. यासोबतच त्यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, काँग्रेसला माझा प्रश्न आहे की, त्यांची अशी काय मजबुरी काय आहे. सनातनच्या विरोधात विष पेरणाऱ्यांसोबत तुम्ही का बसलात? काँग्रेसने आपले मूळ चारित्र्य गमावले आहे का? असा प्रश्न त्यांनी केला.
"गहू विकून ब्रेड खरेदी करणं... हे होऊ शकत नाही"; पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं