पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवस संसदेत काँग्रेसला झोडपल्यानंतर आज त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उत्तर प्रदेश, पंजाब निवडणूक आणि कृषी कायदे, घराणेशाहीवर भाष्य केले. राहुल गांधींसह, सपाच्या अखिलेश यादवांवर तोंडसुख घेतले. यावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत मोदींच्या आरोपावर उत्तर दिले आहे. संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मन की बात झाली नाही, त्यामुळे आता मतदानाच्या आधी टीव्हीवर एक तास आले. राजाची भीती स्पष्ट आहे आणि खोल.परंत जनतेने तर तिची मन की बात ठरविली आहे. उद्या गरीब, शेतकरी, मजूर, तरुण आणि सामान्य जनता मतदानातून उत्तर देईल, असे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. First phase UP Elections सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. ११ जिल्ह्यांच्या ५८ विधानसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. या टप्प्यात शामली, हापूर, गौतम बुद्ध नगर, मुझफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाझियाबाद, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा जिल्ह्यांतील विधानसभा जागांवर मतदान होणार आहे.