PM Modi Karnataka Visit: 'HAL चे नाव घेऊन लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले...' PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:57 PM2023-02-06T18:57:23+5:302023-02-06T18:58:03+5:30

PM Modi Karnataka Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये HAL हेलिकॉप्टर फॅक्टरीचे उद्घाटन केले.

PM Modi Karnataka Visit: 'Incited people by taking the name of HAL...' PM Modi hits out at Congress | PM Modi Karnataka Visit: 'HAL चे नाव घेऊन लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले...' PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

PM Modi Karnataka Visit: 'HAL चे नाव घेऊन लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले...' PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Next


PM Modi Inaugurates HAL: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (6 फेब्रुवारी) कर्नाटकातील तुमाकुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन केले. लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरचे अनावरणही यावेळी करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, आज तुमकुरूला देशातील खूप मोठा हेलिकॉप्टर कारखाना मिळाला आहे. तुमाकुरु इंडस्ट्रियल टाऊनशिपचीही पायाभरणी झाली. 

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा 
काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, 'भाजप सरकारवर खोटे आरोप लावण्यासाठी याच HAL चा वापर केला गेला होता. याच एचएएल नावाने लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले गेले होते. यात संसदेच्या कामकाजाचे अनेक तास वाया गेले. पण कितीही खोठे आरोप केले तरी एक दिवस सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. एचएएलचा हेलिकॉप्टर कारखाना आणि त्याची वाढती शक्ती खोटे आरोप करणाऱ्यांचा पर्दाफाश करेल', अशी टीका पंतप्रधानांनी केली. 2018 मध्ये राहुल गांधींनी बंगळुरुमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यानंतर त्यांनी सरकारवर एचएएलचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

कर्नाटक संतांची भूमी
पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'कर्नाटक ही संतांची भूमी आहे. संतांच्या आशीर्वादाने आज शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी, कर्नाटकातील तरुणांना रोजगार, ग्रामस्थ आणि महिलांना सुविधा उपलब्ध करून देणे, देशाचे सैन्य बळकट करणे आणि मेड इन इंडिया या प्रकल्पांचे उद्घाटन झाले. डबल इंजिन सरकारने कर्नाटकला गुंतवणूकदारांची पहिली पसंती दिली आहे. राष्ट्र प्रथम या भावनेने काम केले की यश मिळते. आपल्या संरक्षण गरजांसाठी आपल्याला परदेशावरील आपले अवलंबित्व कमी करावे लागेल.' 

'आज अशी शेकडो शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे आहेत, जी फक्त भारतातच बनवली जात आहेत. याचा वापर आपले सैन्य करत आहेत. कर्नाटक ही तरुण प्रतिभा, तरुण नवनिर्मितीची भूमी आहे. ड्रोन निर्मितीपासून तेजस लढाऊ विमाने बनवण्यापर्यंत, कर्नाटकच्या उत्पादन क्षेत्राची ताकद जग पाहत आहे. गेल्या 8 वर्षांत आम्ही खाजगी क्षेत्रासाठीही दरवाजे उघडले आहेत. आज आधुनिक अ‍ॅसॉल्ट रायफल्सपासून रणगाडे, नौदलासाठी विमानवाहू युद्धनौका, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, वाहतूक विमाने भारत स्वत: तयार करत आहे. आगामी काळात तुमकुरूमध्ये शेकडो हेलिकॉप्टर तयार होणार असून त्यामुळे सुमारे 4 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होणार आहे, असंही मोदी म्हणाले.

Web Title: PM Modi Karnataka Visit: 'Incited people by taking the name of HAL...' PM Modi hits out at Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.