नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी आण्विक पाणबुडी असलेल्या INS अरिहंत टीमला भेट दिली आहे. INS अरिहंत ही पाणबुडी डेटरेंस पेट्रोल (टेहळणी) करून परतली आहे. पाणबुडीच्या अभ्यासानं भारताच्या नाभिकीय त्रिकोणा(Nuclear Triad)ची स्थापना झाली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरिहंत टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सध्याच्या घडीला आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असणं गरजेचं आहे. जे देश आण्विक हल्ल्याची भीती दाखवून जगाला ब्लॅकमेल करत आहेत, त्यांच्यासाठी आयएनएस अरिहंत हे चोख प्रत्युत्तर आहे. ज्या देशांना पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान अवगत आहे, अशा देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.
आण्विक हल्ल्यांची धमकी देणाऱ्यांना INS अरिहंत हे चोख प्रत्युत्तर- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 5:40 PM