पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांचं भूमिपूजन केलं. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी महाराजा सुहेलदेव स्वशासी राज्य आरोग्य महाविद्यालय, बहराईचचं लोकर्पणही केलं. यादरम्यान, त्यांनी डिजिटल माध्यमातूल उपस्थितांना संबोधित केलं. "आज मला बहराइचमध्ये महाराजा सुहेलदेव जी यांच्या भव्य स्मारकाची पायाभरणी करण्याचं भाग्य लाभलं आहे. हे आधुनिक आणि भव्य स्मारक ऐतिहासिक चित्तौरा तलावाचा विकास, बहराइचवरील महाराजा सुहेलदेल यांचा आशीर्वाद वाढवेल आणि येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरित करेल," असं मोदी यावेळी म्हणाले."भारताचा इतिहास केवळ तोच नाही, जो देशाला गुलाम बनवणाऱ्यांनी, गुलामगिरीच्या मानसिकतेसोबत इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिला. भारताचा इतिहास तो आहे जो भारताच्या सामान्य जनतेत, भारताच्या लोकगाथांमध्ये आहे, जो पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. बहराइचसारख्या विकासाच्या महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधांची वाढ केल्यास येथील लोकांचे जीवन सुकर होईल. त्याचे फायदे केवळ श्रावस्ती, बलरामपूर, सिद्धार्थनगर या आसपासच्या जिल्ह्यांनाच नाही तर नेपाळहून येणाऱ्या रूग्णांनाही मिळणार असल्याचं ते म्हणाले.
देशाचा इतिहास केवळ तो नाही, जो गुलामगिरीच्या मानिसकतेसोबत लिहिणाऱ्यांनी लिहिला : पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 14:10 IST
PM Narendra Modi Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं विकासकामांचं भूमिपूजन
देशाचा इतिहास केवळ तो नाही, जो गुलामगिरीच्या मानिसकतेसोबत लिहिणाऱ्यांनी लिहिला : पंतप्रधान मोदी
ठळक मुद्देउत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं विकासकामांचं भूमिपूजनमहाराजा सुहेलदेव जी यांच्या भव्य स्मारकाची पायाभरणी करण्याचं भाग्य, मोदींचं वक्तव्य