पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत, यासाठी आज दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहेत.२२ ते २४ ऑगस्ट दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींना दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष मातामेला सिरिल रामाफोसा यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. पंतप्रधान मोदींचा हा तिसरा दक्षिण आफ्रिका दौरा आहे. या कार्यक्रमात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.
बळीराजाला उत्पन्न मिळू नये असाच सरकारचा कारभार, कांदा रडवतो अन्...; ठाकरे गटाचा 'बाण'
ब्रिक्स परिषदे संदर्भात पीएमओकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. “दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून मी २२-२४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकाला भेट देत आहे.” जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्यासही मी उत्सुक आहे. मी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून २५ ऑगस्ट २०२३ रोजी दक्षिण आफ्रिकेतून अथेन्स, ग्रीस येथे जाईन. या प्राचीन भूमीला माझी ही पहिलीच भेट असेल. ४० वर्षांनंतर ग्रीसला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान होण्याचा मान मला मिळाला आहे, असं निवेदनात म्हटले आहे.
पीएम मोदी यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्यांची काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका होणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन १५ व्या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावतील, तर रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव करतील. जोहान्सबर्गमधील त्यांच्या व्यस्ततेची पूर्तता केल्यानंतर, पंतप्रधान मोदी ग्रीसच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून २५ ऑगस्ट रोजी अधिकृत भेटीसाठी ग्रीसला रवाना होतील. '१५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी, ब्रिक्स बिझनेस कौन्सिल, ब्रिक्स महिला बिझनेस अलायन्स आणि ब्रिक्स बिझनेस फोरमच्या बैठकांमध्ये भाग घेण्यासाठी भारताचे एक व्यावसायिक शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिकेला भेट देणार आहेत, असंही सांगण्यात आले आहे.