नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार असून या भाषणाकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. नॅशनल हेल्थ कार्डसह रेल्वे आणि संरक्षण विभागाबाबतच्या सुधारणांविषयी ते मोठ्या घोषणा करु शकतात.मोदींच्या भाषणात ‘वन नॅशन वन रेशन कार्ड’या योजनेचाही उल्लेख होऊ शकतो. आतापर्यंत या योजनेशी २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश जोडले गेले आहेत. आगामी काही महिन्यात लक्षद्विप, लडाख, तामिळनाडू, छत्तीसगड, दिल्ली, मेघालय, पश्चिम बंगाल यांना जोडण्यात येणार आहे.कोरोना साथीमुळे यंदा परिस्थिती बदलली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या भाषणात आगामी आव्हानांचाही उल्लेख केला जाऊ शकतो. अर्थव्यवस्थेबाबत ते काय बोलतात याकडे लक्ष लागलेले आहे.
मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणाकडे लक्ष; 'या' मोठ्या घोषणा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 2:47 AM