PM Modi and Sheikh Hasina Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी दिल्लीत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांची भेट घेतली. यादरम्यान भारत आणि बांगलादेशमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांनी माहिती तंत्रज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत दिल्लीत संयुक्त निवेदन जारी केले. “आज बांगलादेश भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आणि या क्षेत्रातील आमचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. लोकांसदरम्यान सहकार्य सातत्यानं वाढत आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
अनेक करारांवर स्वाक्षऱ्या“आम्ही माहिती तंत्रज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा यांसारख्या क्षेत्रातही सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी आम्ही बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा ५० वा वर्धापन दिन, आमच्या राजनैतिक संबंधांचा सुवर्ण महोत्सव, शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी एकत्र साजरी केली. मला खात्री आहे की पुढील २५ वर्षांमध्ये भारत-बांगलादेश यांच्यातील मैत्री नवीन उंची गाठेल,” असेही मोदी म्हणाले.
“आज आम्ही कुशियारा नदीतील पाणी वाटपाच्या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा भारतातील दक्षिण आसाम आणि बांगलादेशातील सिल्हेट भागाला होईल. अशा ५४ नद्या भारत-बांगलादेश सीमेवरून जातात आणि शतकानुशतके दोन्ही देशांतील लोकांच्या उपजीविकेशी जोडल्या गेलेल्या आहेत. या नद्या लोककथा, त्यांच्याबद्दलची लोकगीते, आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशाच्या साक्षीदार आहेत,” असंही ते म्हणाले.
‘भारताचे आभार’पुढील २५ वर्षआंसाठी अमृत काळाच्या मी शुभेच्या देते. भारत आत्मनिर्भर भारतासाठी केलेल्या प्रस्तावांना प्राप्त करण्यात अग्रेसर आहे. भारतात मी जवळपास ३ वर्षांनंतर आली आहे. मी भारताचे आभार मानते आणि आमच्यादरम्यान एक सकारात्मक बाबींचीही अपेक्षा करते, असं शेख हसीना म्हणाल्या.